Posts Tagged ‘vartaman patra’

Ch-4: ती कुठे गेली ? (शून्य- कादंबरी)

January 20, 2008
Online Novel Eng/Hin/Mar Suspense thriller
Zero – The Free Online Suspense thriller Novel in English Hindi & Marathi
http://EnglishOnlineNovel.blogspot.com
http://HindiOnlineNovel.blogspot.com
http://MarathiOnlineNovel.blogspot.com

हॉस्पिटलच्या समोर एक पांढरी कार येऊन थांबली. त्यातून जॉन उतरला. आज तो त्याच्या नेहमीच्या युनिफार्ममध्ये नव्हता. त्याच्या हातात एक पांढऱ्या फुलांचा गुच्छ पण होता. सरळ लिफ्टकडे जाऊन त्याने लिफ्टचे बटन दाबले. लिफ्टमध्ये जाऊन त्याने फ्लोअर नं. 12 चे बटन दाबले. लिफ्ट बंद होऊन वर जायला लागली. त्याच्या डोक्यात पुन्हा विचारांची गर्दी व्हायला लागली…

भिंतीवर रक्ताने गोल का काढले असावे?…

मेडीकल चेकींगमध्ये रक्त सानीचेच होते….

नक्कीच गोल ज्याने काढले तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत असावा….

खून कोणी केला असावा याची कल्पना अँजेनीला असेल का?…

लिफ्ट थांबली व लिफ्टची बेल वाजली. जॉनचे विचारचक्र थांबले. समोर इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेमध्ये 12 हा आकडा आला होता. लिफ्टचे दार उघडले आणि जॉन लिफ्टच्या बाहेर पडला. लांब लांब पाऊले टाकीत सरळ तो ‘बी’ वार्डमध्ये गेला.

जॉनने एकदा आपल्या हातातल्या पांढऱ्या फुलांच्या गुच्छाकडे बघितले आणि त्याने ‘बी2’ रूमचा दरवाजा ठोठावला. थोडा वेळ त्याने वाट बघितली. आत काहीच चाहूल नव्हती. त्याने दार पुन्हा वाजविले. काहीच प्रतिसाद नाही. त्याने आपली गोंधळलेली नजर व्हरंड्यात इकडे तिकडे फिरविली. त्याला आता काळजी वाटायला लागली होती. तो दार जोर जोराने ठोठावयाला लागला.

काय झाले असेल? …

इथेच तर होती ती….

आज तर तिला डिस्चार्ज करणार नव्हते…

मग कुठे गेली असेल ती?…

काही अघटित तर घडले नसावे…

त्याला धडधडायला लागले. त्याने पुन्हा आजूबाजूला बघितले. वार्डाच्या शेवटी एक काऊंटर होते. काऊंटरवर माहिती मिळेल – असा विचार करून तो काऊंटरकडे घाई घाई जायला लागला.

“एक्सक्यूज मी” त्याने काऊंटरवरच्या नर्सचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

नर्सला हे रोजचेच असावे, जॉनकडे लक्ष न देता तिने आपले काम चालूच ठेवले.

” ‘बी2’ ला एक पेशंट होता अँजेनी कार्टर … कुठं आहे ती? … तिला काय डिस्चार्ज दिला का? … पण तिचा डिस्चार्ज तर आज नव्हता … मग कुठे गेली ती? … तिथे तर कोणीच नाही ” जॉनने प्रश्नांची सरबत्ती लावली.

” एक मिनिट … एक मिनिट … कोणती रूम म्हणालात तुम्ही?” नर्सने त्याला थांबवित विचारले.

“बी2” जॉन श्वास घेत म्हणाला.

नर्सने एक फाईल काढली. फाईल उघडून ‘बी2′ … बी2’ म्हणत तिने फाईलच्या इंडेक्सवरुन बोट फिरविले. मग इंडेक्सवर लिहिलेले पेज नंबर बघण्यासाठी तिने फाईलचे काही कागद चाळले.

“‘बी2’ … मिसेस अँजेनी कार्टर…” नर्स खात्री करण्यासाठी म्हणाली.

” हो …अँजेनी कार्टर” जॉनने कंन्फर्म केले.

जॉनने उत्कंठेने तिच्याकडे बघितले. पण ती अगदी शांत होती. जॉनची उत्कंठा आता शिगेला पोहोचली होती. त्याला तिच्या शांतपणाचा रागही येत होता.

” सॉरी … मिस्टर ..?” नर्स जॉनकडे बघत म्हणाली.

जॉनच्या हृदयाचा ठोका चुकला होता.

” मिस्टर ..जॉन” जॉनने स्वत:ला सावरत आपले नाव सांगितले.

” सॉरी … मिस्टर जॉन … सॉरी फॉर इनकन्व्हीनियंस … तिला दुसऱ्या रूममध्ये … बी23 मध्ये हलविले आहे….” नर्स बोलत होती.

जॉनच्या जिवात जीव आला.

” अॅक्चूूअली … बी2 फार कंजेस्टेड होत होती ना … म्हणून त्यांच्याच…” नर्स सविस्तर सांगत होती.

पण जॉनला कुठे ऐकण्याची सवड होती? नर्स तिचे सांगणे पूर्ण करायच्या आधीच जॉन निघाला होता… बी23 कडे.
(क्रमशः …)

For more posts visit –

Online Novel Eng/Hin/Mar Suspense thriller
Zero – The Free Online Suspense thriller Novel in English Hindi & Marathi
http://EnglishOnlineNovel.blogspot.com
http://HindiOnlineNovel.blogspot.com
http://MarathiOnlineNovel.blogspot.com