marathi sahitya – marathi horror, suspense thriller novel – ad-bhut

April 8, 2008

Ch- 1: किंकाळी ( Online Marathi Novel – Ad-Bhut )

netxs chapters on http://marathinovels.net

गडद रात्र आणि त्यात मुसळधार पाऊस. सारा आसमंतात रातकीडयांच्या किर्र असा आवाज घुमत होता . एका बंगल्याच्या शेजारच्या झाडावर पाण्याने भीजलेले एक घूबड बसले होते . त्याची भिरभीरती भेदक नजर समोरच्या बंगल्याच्या एका आतून प्रकाश येत असलेल्या खिडकीवर खिळून थांबली . घरात त्या खिडकीतून दिसणारा तो एक लाईट सोडून सर्व लाईट्स बंद होते. अचानक तिथे त्या खिडकीजवळ आसऱ्यासाठी बसलेल्या कबुतरांचा झुंड च्या झुंड तिथून फडफड करीत उडून गेला. कदाचित तिथे एखाद्या अदृष्य शक्तीचं अस्तीत्व त्या कबुतरांना जाणवलं असावं. खिडकीचे काच पांढऱ्या रंगाचे असल्यामुळे बाहेरुन आतलं काहीच दिसत नव्हतं. खरचं तिथे काही अदृष्य शक्ती पोहोचली होती का? आणि पोहोचली होती तर तिला आत जायचे होते का? पण खिडकीतर आतून बंद होती.

बेडरुममध्ये बेडवर कुणीतरी झोपलेले होते. त्या बेडवर झोपलेल्या आकृतीने कड बदलला आणि त्या आकृतीचा चेहरा दुसऱ्या बाजूला झाला. त्यामुळे कोण होतं ते ओळखनं कठीण होतं. बेडच्या बाजुला एक चष्मा ठेवलेला होता. कदाचीत जे कुणी झोपलेलं होतं त्याने झोपण्याआधी आपला चष्मा काढून बाजुला ठेवला असावा. बेडरुममध्ये सगळीकडे मद्याच्या बाटल्या, मद्याचे ग्लासेस, वर्तमान पत्रे, मासिके इत्यादी सामान अस्तव्यस्त इकडे तिकडे पसरलेलं होतं. बेडरुमचे दार आतून बंद होते आणि त्याला आतून लॅच लावलेला होता. बेडरुमची एकुलती एक खिडकी तिही आतून बंद केलेली होती – कारण ती एक एसी रुम होती. जी आकृती बेडवर झोपलेली होती तिने पुन्हा आपला कड बदलला आणि आता त्या आकृतीचा चेहरा दिसायला लागला. स्टीव्हन स्मीथ, वय साधारण पंचविस-सव्वीस, सडपातळ बांधा, चेहऱ्यावर कुठे कुठे दाढीचे खुंट आलेले, डोळ्याभोवती चश्म्यामुळे तयार झालेली काळी वतृळं. काहीतरी हळू हळू स्टीव्हनपाशी जायला लागलं. अचानक झोपेतही स्टीव्हनला चाहूल लागली आणि तो दचकुन जागा झाला. त्याच्या समोर जे काही होतं ते त्याच्यावर हल्ला करण्याच्या पावित्र्यात असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर भीती पसरली, सर्वांगाला घाम फुटला. तो प्रतिकार करण्याच्या उद्देशाने उठू लागला. पण तो प्रतिकार करण्याच्या आधीच त्याने त्याच्यावर, आपल्या सावजावर झडप घातली होती. सगळ्या आसमंतात स्टीव्हनच्या एका मोठ्या आगतीक, भयावह किंकाळीचा आवाज घुमला. आणि मग सगळीकडे शांतताच शांतता पसरली .. अगदी पुर्ववत…

क्रमश:…

netxs chapters on http://marathinovels.net
Advertisements

Ch-4: ती कुठे गेली ? (शून्य- कादंबरी)

January 20, 2008
Online Novel Eng/Hin/Mar Suspense thriller
Zero – The Free Online Suspense thriller Novel in English Hindi & Marathi
http://EnglishOnlineNovel.blogspot.com
http://HindiOnlineNovel.blogspot.com
http://MarathiOnlineNovel.blogspot.com

हॉस्पिटलच्या समोर एक पांढरी कार येऊन थांबली. त्यातून जॉन उतरला. आज तो त्याच्या नेहमीच्या युनिफार्ममध्ये नव्हता. त्याच्या हातात एक पांढऱ्या फुलांचा गुच्छ पण होता. सरळ लिफ्टकडे जाऊन त्याने लिफ्टचे बटन दाबले. लिफ्टमध्ये जाऊन त्याने फ्लोअर नं. 12 चे बटन दाबले. लिफ्ट बंद होऊन वर जायला लागली. त्याच्या डोक्यात पुन्हा विचारांची गर्दी व्हायला लागली…

भिंतीवर रक्ताने गोल का काढले असावे?…

मेडीकल चेकींगमध्ये रक्त सानीचेच होते….

नक्कीच गोल ज्याने काढले तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत असावा….

खून कोणी केला असावा याची कल्पना अँजेनीला असेल का?…

लिफ्ट थांबली व लिफ्टची बेल वाजली. जॉनचे विचारचक्र थांबले. समोर इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेमध्ये 12 हा आकडा आला होता. लिफ्टचे दार उघडले आणि जॉन लिफ्टच्या बाहेर पडला. लांब लांब पाऊले टाकीत सरळ तो ‘बी’ वार्डमध्ये गेला.

जॉनने एकदा आपल्या हातातल्या पांढऱ्या फुलांच्या गुच्छाकडे बघितले आणि त्याने ‘बी2’ रूमचा दरवाजा ठोठावला. थोडा वेळ त्याने वाट बघितली. आत काहीच चाहूल नव्हती. त्याने दार पुन्हा वाजविले. काहीच प्रतिसाद नाही. त्याने आपली गोंधळलेली नजर व्हरंड्यात इकडे तिकडे फिरविली. त्याला आता काळजी वाटायला लागली होती. तो दार जोर जोराने ठोठावयाला लागला.

काय झाले असेल? …

इथेच तर होती ती….

आज तर तिला डिस्चार्ज करणार नव्हते…

मग कुठे गेली असेल ती?…

काही अघटित तर घडले नसावे…

त्याला धडधडायला लागले. त्याने पुन्हा आजूबाजूला बघितले. वार्डाच्या शेवटी एक काऊंटर होते. काऊंटरवर माहिती मिळेल – असा विचार करून तो काऊंटरकडे घाई घाई जायला लागला.

“एक्सक्यूज मी” त्याने काऊंटरवरच्या नर्सचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

नर्सला हे रोजचेच असावे, जॉनकडे लक्ष न देता तिने आपले काम चालूच ठेवले.

” ‘बी2’ ला एक पेशंट होता अँजेनी कार्टर … कुठं आहे ती? … तिला काय डिस्चार्ज दिला का? … पण तिचा डिस्चार्ज तर आज नव्हता … मग कुठे गेली ती? … तिथे तर कोणीच नाही ” जॉनने प्रश्नांची सरबत्ती लावली.

” एक मिनिट … एक मिनिट … कोणती रूम म्हणालात तुम्ही?” नर्सने त्याला थांबवित विचारले.

“बी2” जॉन श्वास घेत म्हणाला.

नर्सने एक फाईल काढली. फाईल उघडून ‘बी2′ … बी2’ म्हणत तिने फाईलच्या इंडेक्सवरुन बोट फिरविले. मग इंडेक्सवर लिहिलेले पेज नंबर बघण्यासाठी तिने फाईलचे काही कागद चाळले.

“‘बी2’ … मिसेस अँजेनी कार्टर…” नर्स खात्री करण्यासाठी म्हणाली.

” हो …अँजेनी कार्टर” जॉनने कंन्फर्म केले.

जॉनने उत्कंठेने तिच्याकडे बघितले. पण ती अगदी शांत होती. जॉनची उत्कंठा आता शिगेला पोहोचली होती. त्याला तिच्या शांतपणाचा रागही येत होता.

” सॉरी … मिस्टर ..?” नर्स जॉनकडे बघत म्हणाली.

जॉनच्या हृदयाचा ठोका चुकला होता.

” मिस्टर ..जॉन” जॉनने स्वत:ला सावरत आपले नाव सांगितले.

” सॉरी … मिस्टर जॉन … सॉरी फॉर इनकन्व्हीनियंस … तिला दुसऱ्या रूममध्ये … बी23 मध्ये हलविले आहे….” नर्स बोलत होती.

जॉनच्या जिवात जीव आला.

” अॅक्चूूअली … बी2 फार कंजेस्टेड होत होती ना … म्हणून त्यांच्याच…” नर्स सविस्तर सांगत होती.

पण जॉनला कुठे ऐकण्याची सवड होती? नर्स तिचे सांगणे पूर्ण करायच्या आधीच जॉन निघाला होता… बी23 कडे.
(क्रमशः …)

For more posts visit –

Online Novel Eng/Hin/Mar Suspense thriller
Zero – The Free Online Suspense thriller Novel in English Hindi & Marathi
http://EnglishOnlineNovel.blogspot.com
http://HindiOnlineNovel.blogspot.com
http://MarathiOnlineNovel.blogspot.com

Ch-1:Happy Go Unlucky (Novel-Zero)

January 9, 2008
Online Novel Eng/Hin/Mar Suspense thriller
Zero – The Free Online Suspense thriller Novel in English Hindi & Marathi
http://EnglishOnlineNovel.blogspot.com
http://HindiOnlineNovel.blogspot.com
http://MarathiOnlineNovel.blogspot.com 

The himalayas valley, and on the valley there were tall trees, as if trying to reach the clouds in the sky. Ahead far away the valley slope was shining, as it was covered with pallid snow. And far somewhere from those shining slopes a rivulet was originated. The rivulet was flowing swiftly taking enthralling snake turns around the valley, and making melodious, pleasant sound.

Tall trees, bird chirps, melodious sound of the flowing river, it was difficult to judge at least from the atmosphere that which era was going on. Since thousands, rather millions years this natural phenomenon must be going on and on. If there is no intrusion of the human in such atmosphere and there are no signs of their, so called progress, then there is no difference in the old era and the modern era as such. At the bottom of one of these tall Himalayan hills, an ancient cave was nestled. The cave was surrounded by tall grass, waving with the chilled breeze. In the cave a rishi was engrossed in meditation. Long hairs on the head, long beard, long mustache, all hairs, as if tired from growing. Out of long meditation, an aura, a deep seriousness was developed on and around his face. Ignorant from the atmosphere around, in fact ignorant from the era, the place and his body his consciousness would have been traveling through the ages. While traveling though eternal, infinite ages at last his minuscule consciousness had entered the modern age ….

An evening in America. A footpath of one of the crowded road of the crowded city. People were walking, and their modernity was reflecting through the way they were walking on the footpath. Vehicles were rushingon the road. The people were so immersed in themselves that they were not free to look at the other companions walking beside them. Everything was systematic, as if preplanned, like self-driving machines or robots. They were looking straight ahead along the line of their noses, may be they thought it’s against their manners to look around. In such a group of people a beautiful, slim lady Angeni, with everlasting sweet smile on her face, must be around 25, was walking along, holding a jam packed shopping bag in one hand. She turned to enter a shop, taking care of the hairs coming on her face with the other free hand. She must have almost completed her shopping; it was evident from her jam-packed shopping bag. Suddenly a police vehicle rushed on the road making irritating high pitch siren sound. The mob walking on the footpath got disturbed. Anjeni stopped abruptly in the shop door, turned and started looking to check what happened? All people started to look in confusion, some stopping while walking, while others turning while walking. As if their expressionless faces experienced the emotion of fear since long. Some people were still successful in hiding their expressions, might be showing some expression did not feet in their manners. Police van vanished in the speed with which it came. Road was disturbed for a while like a stone falls and generates waves in the water. Again everything became normal, like a machine, as if nothing had happened. Anjani turned and entered the shop. How could she know that the van just passed by had some connection with her life?

Police van stopped by an apartment in a rich lavish colony. Some residents of the colony were relaxing in their balconies, started looking at the police van in confusion. There was an unnatural silence in the colony. John and his team got down, rushed to the apartment lift. Police driver parked his vehicle in the parking lot. As John and his team reached the lift, they were disappointed by not finding the lift in place.
“Shit…” John said in annoyance, pressed the lift button and waited for the lift to come down.
John was impatiently pressing the lift button again and again. After some time at last the lift came down. John pressed the button again; door opened. A person wearing black T-shirt came out. Some white letters scribed on the T-shirt caught John’s attention. It was ‘Zero’ written in white letters. John and his team entered the lift at once. John pressed the button having number 10 written on it. Lift closed and started running upwards.
Lift stopped at 10th floor. As all of them including John rushed out, they saw an open flat in front of them, they darted towards it. When they reached the open door, they slowly, cautiously entered in, covering each other. Finding nobody in the hall, John and his two associates turned towards the bed room. Rest of the team started searching kitchen, study room and other rooms. Kitchen and study room was empty. While entering the bedroom John realized that most of the things in the bedroom were lying around clumsily, probably thrown by somebody. He signaled two of his associates and they started entering the bedroom carefully, covering each other. As they entered the bedroom, they witnessed a terrible scene, more than they expected. A badly injured man was lying on the bed, a pool of blood around him. His body was motionless, might be dead or unconscious. John went to him and checked his pulse. He was already dead, might be quite some time back.
” Here … here it goes” John’s associate said calling others. Other team members immediately joined them. John looked around inspecting to find any trace. Suddenly a wall adjacent to bed cached his attention. There were blood spots spread around on the wall. As he looked carefully at it, it was something written on the wall with blood, a circle was drawn.
What does it mean?
Johns thought process accelerated.
To whom this blood belongs? – to the corpse?, to the killer? or to somebody else?
Whether the circle was drawn by the killer or the victim just before dieing.
” You people carry on” John instructed to his team to carry on their usual investigation procedure.
His associates started on the jobs assigned to them. John again observe carefully looking around the bedroom. There was a study table in the corner, a photograph of a victim placed on it. There was various post envelopes scattered around on the table. John picked up one randomly.
‘To Sani Carter’ was written on it.
Victim’s name must be Sani Carter, as those were the letters arrived to him through post. John picked up the bunch. Going through those envelopes he casually walked to the window and looked outside. Wow…. there was a beautiful lake outside, surrounded by pleasent greenary. For a while John forgot the atmosphere around and got immersed in the stunning scene outside. While looking at the lake suddenly something connected him back again to the atmosphere in the room. What was it? It was the shape of the lake; it was nearly a circular lake.
John started thinking again-
‘ What is it , which is drawn on the wall?’
Suddenly a thought strike him-
‘ Does it mean Zero?… yes it must be zero’
He spoke aloud ”Sam and you… Dan”
”Yes sir” Sam and Dam came forward.
”While getting into the lift, we saw a guy wearing a black T-shirt … and there was ‘Zero’ drawn on it… are you aware of?” John asked them.
”Yes sir… I remember his face” Sam said.
”Yes sir… I also remember” Dan also backed up.
”Good… quickly go down …. and get him… come on go … quick… still he must be around…”
” Yes sir”
Sam and Dan darted out to get him.
.. to be contd…

for more posts go to http://englishonlinenovel.blogspot.com

Online Novel Eng/Hin/Mar Suspense thriller
Zero – The Free Online Suspense thriller Novel in English Hindi & Marathi
http://EnglishOnlineNovel.blogspot.com
http://HindiOnlineNovel.blogspot.com
http://MarathiOnlineNovel.blogspot.com

 

Ch-3:वर्ल्ड अंडर अंडरवर्ल्ड (शून्य- कादंबरी)

January 8, 2008
Online Novel Eng/Hin/Mar Suspense thriller
Zero – The Free Online Suspense thriller Novel in English Hindi & Marathi
http://EnglishOnlineNovel.blogspot.com
http://HindiOnlineNovel.blogspot.com
http://MarathiOnlineNovel.blogspot.com

एका कॉलनीत एक टुमदार घर. बाहेर एक कार येऊन थांबली. कारमधून उतरून एकजण घराच्या आवारात शिरला. तो जवळपास पंचविशीच्या आसपास असावा. त्याने काळा गॉगल घातला होता. चालता चालता आवारातील गार्डनवर नजर फिरवीत तो दरवाज्यापाशी पोहोचला. आपल्या कारकडे एक नजर टाकीत त्याने दारावरची बेल वाजवली. दार उघडण्याची वाट पाहत तो कॉलनीतल्या इतर घरांकडे बघायला लागला. दार उघडण्यासाठी बराच वेळ लागत होता. दारासमोर शतपावली केल्यासारखे फिरत तो दार उघडण्याची वाट पाहू लागला. आतून चाहूल लागताच तो आत जाण्याच्या पावित्र्यात दारासमोर थांबला. दार उघडले. समोर दारात त्याच्याच वयाचा एकजण उभा राहिला. आतला दारातून बाजूला झाला आणि बाहेरचा घरात शिरला. ना बोलण्याची ना हावभावांची काहीच देवाणघेवाण नाही. बाहेरचा आत गेल्यावर आतून दार बंद झालं. त्यांचं राहाणीमान ,पेहराव आणि शरीराची ठेवण यावरून दोघांचंही मूळ अमेरिकन तर नक्कीच वाटत नव्हतं. दोघंही चुपचाप चालत घराच्या तळघरात येऊन पोहोचले. घराच्या रचनेवरून या घरास तळघर असावं असं बिलकुल वाटत नव्हतं.
जो बाहेरून आला होता त्याने विचारले, ” बॉसचा मेसेज आला का?”
” अजून नाही…. कधी काय करायचं बॉस सगळं मुहूर्त बघून करतो” दुसरा म्हणाला.
पहिला गालातल्या गालात हसत म्हणाला ” एकेकाचं एक एक खूळ असतं”
दुसरा गंभीर होऊन म्हणाला “कमांड2 तुला जर आमच्यासोबत काम करायचं असेल तर सगळं कसं समजून घ्यावं लागेल. इथं सगळ्या गोष्टी तोलून मोलून प्रिकॅलक्यूलेटेड असतात”
कमांड2 नुसता त्याच्याकडे बघायला लागला.
” कोणतीही गोष्ट करायच्या आधी बॉसला त्याचा रिझल्ट माहित असतो” कमांड1 म्हणाला.
एव्हाना ते अंधाऱ्या तळघरात येऊन पोहोचले. तिथे मध्यभागी एका टेबलवर एक कॉम्प्यूटर ठेवलेला होता. दोघंही काम्प्यूटरच्या समोर जावून उभे राहिले . कमांड1ने कॉम्प्यूटरच्या समोरच्या खुर्चीवर बसून कॉम्प्यूटर सुरू केला. कमांड2 त्याच्या बाजूला एका स्टूलवर बसला. कॉम्प्यूटरवर लिनक्स ऑपरेटींग सिस्टीम सुरू होतांना दिसायला लागली.
” तुला माहित आहे मी लिनक्स का वापरतो?” कमांड1 म्हणाला.
आश्चर्याने बघत कमांड2 ने फक्त नकारार्थी आपलं डोकं हलविलं.
“कॉम्प्यूटरच्या जवळपास सगळ्या ऑपरेटींग सिस्टीम ज्यांचा कोड दिला जात नाही कुठल्या कंपन्या बनवितात?” कमांड1 ने विचारले.
” अमेरिकेतल्या” कमांड2ने उत्तर दिले.
” तुला माहित असेलच की ज्या सॉफ्टवेअरचं कोड कस्टमरला दिलं जातं त्यांना ‘ओपन सोर्स’ सॉफ्टवेअर म्हणतात… म्हणजे त्या सॉफ्टवेअरमध्ये काय होतं हे कस्टमरला कळू शकतं… आणि ज्या सॉफ्टवेअरचा कोडच कस्टमरला दिला नसेल त्या सॉफ्टवेअरमध्ये दुसरं असं बरंच काही होऊ शकतं जे व्हायला नको.” कमांड1 सांगत होता.
“म्हणजे?” कमांड2 ने मध्येच विचारले.
“म्हणजे तुला माहित असेलच की मायक्रोसॉफ्टने एकदा जाहिर केले होते की ते त्यांच्या प्रतिर्स्पध्यांना शह देण्यासाठी त्यांच्या विंन्डोज ऑपरेटींग सीस्टीममध्ये ‘टॅग्ज’ वापरणार आहेत” कमांड1 म्हणाला.
” हो … तर ?” कमांड2 पुढे ऐकू लागला.
” आणि त्या ‘टॅग्ज’ मुळे कंपनीला जे पाहिजेत तेच प्रोग्रॅम व्यवस्थित चालतील आणि दुसरे एकतर स्लो किंवा बरोबर चालणार नाहीत” कमांड1 म्हणाला.
“त्याचा लिनक्स वापरण्याशी काय संबंध?” कमांड2 ने विचारले.
” आहे ना … अगदी जवळचा संबंध आहे… हे बघ जर ते आपल्या प्रतिर्स्पध्यांना शह देण्यासाठी असे ‘टॅग्ज’ वापरू शकतात की जेणे करून त्यांच्या प्रतिर्स्पध्यांचा एकदम खातमा होऊन जाईल… असंही शक्य आहे की ते त्यांच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये असे काही ‘टॅग्ज’ टाकतील की ज्याच्यामुळे सगळ्या जगातली महत्वाची माहिती इंटरनेटद्वारा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल … त्यात आपल्यासारख्या लोकांच्या कारवायासुध्दा आल्या … विशेषत: 9-11 नंतर हे त्यांना फार महत्वाचे झाले आहे” कमांड1 कमांड2कडे बघत त्याची प्रतिक्रिया घेत म्हणाला.
” हो तू बरोबर बोलतो आहेस … असं होऊ शकतं” कमांड2 ने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
“म्हणून मी काय केलं माहित आहे?… लिनक्सचं सोर्स कोड घेऊन त्याला कंपाइल केलं आणि मग या कॉम्प्यूटरमध्ये इन्स्टॉल केलं … आपल्याला सर्वेतोपरी काळजी घेणं फार आवश्यक आहे” कमांड1 सांगत होता.
त्याच्या शब्दात गर्व आणि स्वत:ची शेखी स्पष्टपणे जाणवत होती.
” अरे ही अमेरिका काय चीज आहे हे तुला माहितच नाही … जगावर राज्य करण्याचा त्यांचा मनसुबा आहे आणि त्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात” कमांड1 पुढे सांगायला लागला.
कमांड2ने कमांड1 कडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितले.
” चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल केव्हा पडले ?… तू शाळेत शिकला असशील नं?” कमांड1 ने प्रश्न केला.
” अमेरिकेने चंद्रावर पाठविलेल्या यानातून 1969 साली नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले” कमांड2 ने चटदिशी उत्तर दिले.
“सगळ्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या डोक्यात हेच कोंबलं जात आहे… पण लोकांनी सत्य काय आहे याचा कधी विचार केला? … जो व्हीडीओ अमेरिकेने टी व्ही वर दाखविला होता त्यात अमेरिकेचा झेंडा फडफडतांना दिसत होता… जर चंद्रावर हवाच नसेल तर झेंडा फडफडणार तरी कसा… लोक चंद्रावर उतरले त्यांच्या सावल्या … यानाची बदललेली जागा… असे कितीतरी पुरावे आहेत जे दर्शवितात की अमेरिकेचे यान चंद्रावर गेलेच नव्हते” कमांड1 आवेशात बोलत होता.
” काय बोलतोस तू … मग काय सगळं खोटं आहे? … पण हे सगळं खोटं कशासाठी?” कमांड2 ने आश्चर्याने विचारले.
” खोटं … निखालस खोटं… एवढंच काय त्याच वेळी अवकाशातून सॅटेलाईटमधून जमिनीच्या घेतलेल्या चित्रात जो सेट त्यांनी तयार केला होता त्याचं चित्रसुध्दा मिळालं आहे… आणि हो तू बरोबर विचारलंस … हे खोटं कशासाठी… हा एवढा खटाटोप आणि आटापिटा कशासाठी?… ज्यावेळी अमेरिकेने चंद्रावर मानव गेल्याचं जाहीर केलं तेव्हा रशिया हा अमेरिकेचा सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी होता… आपण रशियापेक्षा वरचढ आहोत हे दाखविण्यासाठी हा सगळा अट्टाहास अमेरिकेने केला होता… आणि त्यात ते सफलसुध्दा झाले होते.” कमांड1चा आवेश शब्दागणिक वाढत होता.
” बापरे ! म्हणजे एवढा मोठा धोका आणि तो पण संपूर्ण जगाला …” कमांड2 च्या तोंडातून निघाले.
” अमेरिका सध्या ब्रिटिशांच्या मार्गाने जात आहे. दुसऱ्या महायुध्दापूर्वी ब्रिटिशांनी जगावर राज्य केलं. त्यावेळी त्यांच्या राज्यावरचा सूर्य कधीच अस्ताला जात नसे. आता अमेरिका ते करू पाहत आहे. फरक एवढाच की ते प्रत्यक्षपणे राज्य न करता अप्रत्यक्षपणे राज्य करीत आहेत म्हणजे ‘प्रॉक्सी रूलींग’. अफगाणिस्थान, इराक, कुवेत, साऊथ कोरिया इथे ते काय करीत आहेत प्रॉक्सी रूलींगच की”
” हो बरोबर आहे तुझं” कमांड2ने दुजोरा दिला.
” आणि हेच अमेरिकेचं वर्चस्व नाहीसं करणं हे आपलं परम उद्देश्य आहे ..” कमांड1 जोशात म्हणाला.
कमांड2 च्या चेहऱ्यावरून असं दिसत होतं की तो कमांड1 च्या बोलण्याने अतिशय प्रभावित झाला आहे. आणि कमांड1 च्या चेहऱ्यावर आपण कमांड2चं ब्रेन वॉश करण्यात सफल झालो आहोत याचं विजयी हास्य तरळत होतं.
तेवढ्यात सुरू झालेल्या कॉम्प्यूटरवर बझर वाजला. कमांड1ला मेल आलेली होती. कमांड1ने मेलबॉक्स उघडला. बॉसची मेल होती.
” हा बॉस आहे तरी कोण?” कमांड2ने उत्सुकतेने विचारले.
“हे कुणालाच माहित नाही … आणि ते महत्वाचंसुध्दा नाही की तो कोण आहे? … आपल्या सगळ्यांना जोडलं आहे ते एका विचारधारेने… आणि ती विचारधाराच महत्वाची… आज बॉस असेल उद्या नसणार … पण त्याची विचारधारा ही नेहमी जिवंत राहिली पाहिजे.” कमांड1 ने मेल उघडता उघडता सांगितले.
मेलमध्ये फक्त ‘हाय’ असे लिहिलेले होते आणि मेलला काहीतरी अटॅच केलेले होते. कमांड1 ने अटॅचमेंट ओपन केली. ते एक मॅडोनाचे ‘बोल्ड’ चित्र होते.
” बॉसने हे चित्र पाठविलं?” कमांड2 ने आश्चर्याने विचारले.
” तू अजून नवीन आहेस तुला कळायला अजून वेळ लागेल की दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असतात” कमांड1 चित्राकडे पाहत गालातल्या गालात हसत म्हणाला.
कमांड1 ने पटापट कॉम्प्यूटरच्या कीबोर्डची चार पाच बटने दाबली. समोर मॉनिटरवर एक सॉफ्टवेअर उघडले. कमांड1ने त्या मॅडोनाच्या चित्राला डबल क्लीक केले. एक निळा प्रोग्रेस बार हळू हळू सरकायला लागला. कमांड1 ने कमांड2 कडे गूढतेने बघितले.
“पण हे काय करतो आहेस स…”कमांड2 म्हणाला.
कमांड1ने चटकन कमांड2च्या तोंडावर हात ठेऊन त्याचे तोंड दाबले.
” चुकूनही तुझ्या तोंडात माझं नाव येता कामा नयेे … तुला माहित आहे? … भिंतीलासुध्दा कान असतात.
“सॉरी” कमांड2 ओशाळून म्हणाला.
“इथे चुकांना क्षमा नाही” कमांड1 दृढतेने म्हणाला.
तोपर्यंत प्रोग्रेस बार सरकून पूर्णपणे निळा झाला होता.
“याला म्हणतात स्टेग्नोग्राफी … म्हणजे चित्रामध्ये माहिती लपविणे … बघणाऱ्याला फक्त चित्र दिसेल … पण या चित्रातसुध्दा बरीच महत्वाची माहिती लपविली जाऊ शकते” कमांड1 त्याला समजावून सांगू लागला.
“पण चित्र इथे यायच्या आधी कुणाच्या हाती जर लागले तर?” कमांड2 प्रश्न उपस्थित केला.
“ती माहिती फक्त या सॉफ्टवेअरनेच बाहेर काढता येते … आणि त्याला पासवर्ड लागतो… हे सॉफ्टवेअर बॉसने स्वत: लिहिलेले आहे… त्यामुळे ते दुसऱ्या कुणाकडे असण्याची अजिबात शक्यता नाही.” कमांड1ने त्याच्या प्रश्नाला समर्पक असे उत्तर दिले.
” काय माहिती लपविली आहे त्यात? कमांड2 ने उत्सुकतेने विचारले.
तेवढ्यात मॉनिटरवर एक मेसेज दिसायला लागला ‘पुढच्या कामाला लाग… त्याची वेळ मागाहून कळविण्यात येईल.’
(क्रमशः …)

Online Novel Eng/Hin/Mar Suspense thriller
Zero – The Free Online Suspense thriller Novel in English Hindi & Marathi
http://EnglishOnlineNovel.blogspot.com
http://HindiOnlineNovel.blogspot.com
http://MarathiOnlineNovel.blogspot.com

Ch-2:आभाळ कोसळलं (शून्य- कादंबरी)

January 7, 2008

अँजेनीने तिची कार अपार्टमेंटच्या पार्किंगच्या जागेकडे वळविली तेव्हा समोर तिला मगाशी दिसलेली पोलीस व्हॅन पार्क केलेली दिसली. तिला धडधडायला लागलं. काय झालं असावं? ती कारमधून उतरून आपल्या शॉपींग बॅग्ज सांभाळत घाईघाईने लिफ्टकडे गेली. लिफ्ट उघडून दोन पोलीस बाहेर येत होते. पोलीसांना पाहून ती अजूनच अस्वस्थ झाली. तिने लिफ्टमध्ये जाऊन बटन दाबले ज्यावर लिहिले होते 10. लिफ्टमधून बाहेर आल्या आल्या जेव्हा अँजेनीने आपल्या सताड उघड्या फ्लॅटसमोर गर्दी बघितली, तिला हातपाय गळाल्यासारखे झाले. तिच्या हातातल्या शॉपींग बॅग्ज गळून पडल्या. ती तशीच गर्दीकडे धावत निघाली. “काय झालं?” तिने कसबसं जमलेल्या लोकांना विचारलं. सगळे जण गंभीर होऊन फक्त तिच्याकडे बघायला लागले . कुणीही बोलायला तयार नव्हता. ती घरात गेली. बेडरूमकडे सगळ्या पोलिसांचा रोख पाहून ती बेडरूमकडे गेली. जाता जाता तिने पुन्हा एका पोलिसाला विचारले ” काय झालं?”. तो फक्त बेडरूमच्या दिशेने बघायला लागला. ती घाईघाईने बेडरूममध्ये गेली. समोरचे दृष्य पाहून तिचे राहिलेलेे अवसानसुध्दा गळून गेले. समोर तिच्या नवऱ्याचे रक्तबंबाळ मृत शरीर पाहून ती जागेवरच कोसळली. कसेबसे तिच्या तोंडून निघाले- ” सानी…”. तिची ती स्थिती पाहून तिला सावरण्यासाठी जॉन तिच्याजवळ गेला. त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. पण हे काय? जॉनच्या लक्षात आले की तिचा श्वासोश्वास बंद पडला होता. जॉनने पटकन आदेश दिला ” अलेक्स कॉल द डॉक्टर इमीडीएटली … आय थींक शी हॅज गॉट अ ट्रिमेंडस शॉक”. अलेक्स पटकन फोनकडे गेला. जॉनला काय करावे काही सुचत नव्हते. “सर शी नीड्स आर्टिफिशीअल ब्रीदिंग” कुणीतरी सुचविले. जॉनने आपल्या तोंडातून तिच्या तोंडात हवा भरली आणि तिचे हृदय सुरू होण्यासाठी तिच्या छातीवर जोर देऊन दाब द्यायला लागला 101 , 102, 103. मोजून त्याने पुन्हा एकदा तिच्या तोंडात हवा भरली आणि तिच्या छातीवर जोर देऊन दबाव द्यायला लागला 101 , 102, 103. असे अजून एकदोन वेळ करून जॉनने तिचा श्वास बघितला. एकदा गेलेला श्वास पुन्हा परत यायला तयार नव्हता. एव्हाना त्याचे साथीदार जवळ येऊन जमा झाले होते. शेवटचा एक प्रयत्न म्हणून तो तिच्या तोंडात हवा भरून मोजायला लागला 101 , 102, 103. हॉस्पिटलमध्ये अँजेनीला इंटेसीव्ह केअर युनिट मध्ये हलविण्यात आले होते. बाहेर दरवाजाजवळ जॉन आणि त्याचा एक साथीदार उभा होता. तेवढ्यात आय.सी.यू मधून डॉक्टर बाहेर आले. बाहेर येताच त्यांनी त्यांच्या तोंडावरचे हिरवे कापड बाजूला सारले. जॉन त्यांच्या जवळ येऊन ते काय म्हणतात याची आतुरतेने वाट पाहू लागला. ” शी इज आऊट ऑफ डेंजर …. नथींग टू वरी” डॉक्टर म्हणाले. तेवढ्यात जॉनच्या मोबाईलची घंटी वाजली. जॉनने मोबाईलचे एक बटन दाबून कानाला लावला , ” यस सॅम” तिकडून आवाज आला ” सर , आम्ही त्याला सगळीकडे शोधलं पण तो आम्हाला सापडला नाही. ” ” नाही सापडला? … आपण येण्यात आणि तो जाण्यात असे किती वेळाचे अंतर होते?… तो जवळपासच कुठेतरी असायला पाहिजे होता.” जॉन म्हणाला. ” नाही सर…. कदाचित त्याने नंतर त्याचा टी शर्ट बदलला असावा कारण आम्ही जवळपासच्या सर्व पोलीस चौकींवर माहिती देऊन सुध्दा तो सापडला नाही” तिकडून आवाज आला. ” बर त्याचं स्केच तयार करायला लागा…. आपल्याला त्याला पकडलंच पाहिजे” जॉनने आदेश दिला. “यस सर” तिकडून आवाज आला. जॉनने मोबाईल बंद केला आणि तो डॉक्टरांना म्हणाला, ” अच्छा, आम्ही आता निघतो… टेक केअर ऑफ हर … आणि जर काही प्रॉब्लेम असला तर आम्हाला कळवा.” ” ओके” डॉक्टर म्हणाले. जाता जाता जॉन त्याच्या सहकाऱ्याला म्हणाला , ” तिचे नातेवाईक असतील तर माहित करा आणि त्यांना इन्फॉर्म करा” ” यस सर” जॉनचा सहकारी म्हणाला.
….(क्रमशः)

Online Novel Eng/Hin/Mar Suspense thriller
Zero – The Free Online Suspense thriller Novel in English Hindi & Marathi
http://EnglishOnlineNovel.blogspot.com
http://HindiOnlineNovel.blogspot.com
http://MarathiOnlineNovel.blogspot.com

Ch-1:हैप्पी गो अनलकी (शून्य- कादंबरी)

January 6, 2008

coverimage21.jpgहिमालयातील ती उंच डोंगररांग आणि डोंगरांवर आकाशाकडे झेपावणारी आणि ढगांशी शिवाशिवीचा खेळ खेळणारी ती उंच झाडे. समोर दूरवर बर्फाच्छादित डोंगरउतार चमकत होता. त्या चमकत्या डोंगरउतारातून कुठून तरी एका नदीचा उगम झालेला होता. आणि ती नदी नागमोडी वळणे घेत घेत एका डोंगराच्या पायथ्याशी नतमस्तक झाल्यासारखी वाहत होती. स्वच्छ शुभ्र अमृतासारखे पाणी खळखळ आवाज करीत वाहत होते.
उंच उंच झाडे, पक्षांचा किलकिलाट, वाहत्या नदीच्या आवाजाचं माधुर्य. वातावरणावरून तरी कोणता काळ असावा हे ओळखणं अशक्यच. हजारो, लाखो वर्षापासूनच्या अशा वातावरणात मानवाच्या प्रगतीचं प्रतीक असलेल्या गोष्टींचं जर अतिक्रमण नसेल तर जुना काळ काय आणि आधुनिक काळ काय, सारखाच. अशा या जागी डोंगराच्या पायथ्याशी नदीच्या शेजारी एक दुर्गम गुहा होती. गुहेभोवतीचे उंच हिरवेगार सळसळते गवत हवेच्या झुळकेसोबत मधून मधून डोलत होते. त्या प्राचीन गुहेत एक ऋषी ध्यानमग्न बसलेला होता. डोक्यावर जटांचे बुचडे बांधलेले. दाढी मिशा वाढून वाढून थकलेल्या. कितीतरी वर्षाच्या साधनेने, एक तेज , एक गांभीर्य ऋषीच्या चेहऱ्यावर आलेलं होतं. आजूबाजूच्या परिसरापासून अनभिज्ञ. नव्हे काळ, जागा आणि शरीरापासून अनभिज्ञ त्याचे विचरण कालत्रयी युगे युगे चाललेले असावे. अनादि अनंत सनातन काळातून विचरण करता करता या आधुनिक काळात त्या ऋषीच्या सूक्ष्म जाणीवेने प्रवेश केला …

अमेरिकेतील एका शहरातील रस्त्याच्या फुटपाथवर संध्याकाळच्या वेळी लोक आपल्या आधुनिकतेच्या रूबाबात चालत होते. रस्त्यावरून वाहने धावत होती. लोक आपापल्यातच एवढे अंतर्मुख होते की एकमेकांकडे लक्ष द्यायलासुध्दा त्यांना वेळ नव्हता. सगळं कसं सुरळीत , पूर्वनियोजित असल्यासारखं एखाद्या स्वयंचलित यंत्रागत. सर्वांची नजर कशी नाकाच्या दिशेने सरळ. कदाचित ते लोक इकडे तिकडे बघणंं म्हणजे बावळटपणा किंवा शिष्टाचाराच्या विरुध्द मानत असावेत. अशा या लोकांच्या समूहातील एक सुंदर स्त्री अँजीनी आपल्या हातात शॉपिंगची बॅग घेऊन एका दुकानात जायला निघाली होती. अँजेनी एक बावीस तेवीस वर्षाची लाघवी , रेखीव चेहऱ्याची, सदा हसतमुख अशी तरुणी होती. एका हाताने आपल्या कपाळावर येणाऱ्या केसांच्या बटा सावरत आणि दुसऱ्या हातात शॉपिंगची बॅग सांभाळत ती दुकानात जात होती. तिच्या काठोकाठ भरलेल्या शॉपिंग बॅगवरून तरी असे जाणवत होते की तिची जवळपास खरेदी पूर्ण झाली असावी, फक्त एकदोन वस्तूच घ्यायच्या राहिल्या असाव्यात. अचानक एक पोलीस व्हॅन सायरन वाजवीत रस्त्यावरून धावायला लागली. लोकांचा सुरळीतपणा जसा भंग झाला. अँजेनी दरवाजातच थांबून काय झालं ते बघायला लागली. कुणी चालता चालता थांबून, कुणी चालता चालता वळून काय झालं ते बघायला लागले. जणू कितीतरी दिवसानंतर त्यांच्या भावशून्य यांत्रिक मख्ख चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटायला लागले. काही जण तर तसेच भावशून्य मख्ख चेहऱ्यांनी काय झालं ते बघायला लागले चेहऱ्यांवर कोणतेही भाव दाखवणं कदाचित त्यांच्या शिष्टाचारात बसत नसावं. पोलीस व्हॅन आली तशी भरधाव वेगाने निघून गेली. रस्ता थोडा वेळ पाण्यात दगड पडून तरंग उठावेत तसा विचलित झाल्यासारखा झाला. आणि पुन्हा पूर्ववत, स्वयंचलित यंत्रागत, जसे काही झालेच नाही असा झाला. अँजेनी दरवाजातून वळून दुकानात गेली. तिला काय माहित होते की आता रस्त्यावरून गेलेल्या पोलीस व्हॅनचा तिच्या जीवनाशी पण काहीतरी संबंध असावा.

पोलीस व्हॅन एका गजबजलेल्या वस्तीत एका अपार्टमेंटच्या खाली थांबली. वस्तीत एक अनैसर्गिक शांतता पसरली. गाडीतून घाईघाईने पोलीस ऑफिसर जॉन आणि त्याची टीम उतरली. काही जण अपार्टमेंटच्या बाल्कनीत बसलेले होते ते वाकून खाली पोलीस व्हॅनकडे बघायला लागले. उतरल्याबरोबर जॉन आणि त्याच्या टीमने अपार्टमेंटच्या लिफ्टकडे धाव घेतली. ड्रायव्हरने गाडी आत नेवून पार्किंगमध्ये पार्क केली. जॉन आणि त्याचे सहकारी लिफ्टजवळ आले. लिफ्ट जागेवर नव्हती. जॉनने लिफ्टचे बटन दाबले. बराच वेळ वाट पाहूनही लिफ्ट यायला तयार नव्हती.
” शिट” चिडून जॉनच्या तोंडून निघाले.
जॉन अस्वस्थतेने लिफ्टचे बटन पुन्हा पुन्हा दाबायला लागला. थोड्या वेळाने लिफ्ट खाली आली. जॉनने लिफ्टचे बटन पुन्हा एकदा दाबले. लिफ्टचा दरवाजा उघडला. आत एकच माणूस होता, काळं टी शर्ट घातलेला. त्याही परिस्थितीत त्याच्या टी शर्टवर लिहिलेल्या अक्षराने जॉनचे लक्ष आकर्षित केले. त्याच्या काळ्या टी शर्टवर पांढऱ्या अक्षराने लिहिलेले होते
‘ झीरो’.
तो माणूस बाहेर येताच जॉन आणि त्याचे साथीदार लिफ्टमध्ये घुसले. जॉनने 10 नं. च्या फ्लोअर चे बटन दाबले. लिफ्ट बंद होऊन वरच्या दिशेने धावायला लागली.

10 नं. फ्लोअरला लिफ्ट थांबली. जॉनसहित सगळे जण भराभर बाहेर आले. त्यांनी बघितले तो समोरच एक फ्लॅट सताड उघडा होता. ते सगळे जण उघड्या फ्लॅटच्या दिशेने धावले. ते एकमेकांना कव्हर करीत हळू हळू फ्लॅटमध्ये जायला लागले. हॉलमध्ये कुणीच नव्हते. जॉन आणि अजून दोन जण बेडरूमकडे वळले. बाकीचे कुणी किचन , स्टडी रूम आणि बाकीच्या रूम्स बघू लागले. किचन आणि स्टडी रूम रिकामीच होती. जॉनला बेडरूमध्ये जातांनाच बेडरूममधले सामान अस्ताव्यस्त झालेले दिसले. त्याने आपल्या साथीदारांपैकी दोघांना खुणावले. जॉन आणि त्याचे दोन साथीदार हळू हळू बेडरूममध्ये जाऊ लागले. ते एकमेकांना कव्हर करीत आत घुसताच, समोर एक विदारक दृष्य त्यांच्यापुढे वाढून ठेवलेले त्यांना दिसले. एक रक्तबंबाळ माणूस बेडवर पडलेला होता. त्याचे शरीर निश्चल होते, एकतर त्याचा जीव गेलेला असावा किंवा तो बेशुध्द झालेला असावा. जॉनने समोर जाऊन त्याची नाडी बघितली. त्याचे प्राणपाखरू केव्हाच उडून गेलेले होते.
” इकडे आहे … इकडे”
जॉनच्या सोबत असलेला एक साथीदार ओरडला.
आता जॉनच्या मागे त्याचे बाकीचे साथीदारसुध्दा आत आले. जॉनने आजूबाजूला न्याहाळून बघितले. अचानक त्याचे लक्ष ज्या भिंतीला बेड लागून होता त्या भिंतीने आकर्षित केले. भिंतीवर रक्त उडाले होते किंवा रक्ताने काहीतरी लिहिलेले होते. जॉनने लक्ष देऊन बघितले. ते लिहिलेलेच असावे कारण भिंतीवर रक्ताने एक गोल काढण्यात आला होता.
गोलचा अर्थ काय असावा?
जॉनचे विचारचक्र फिरायला लागले. आणि ते रक्त या शवाचेच आहे की अजून कुणाचे? ते खुन्याने काढलेले असावे की मग जो मेला त्याने मरायच्या आधी काढले असावे?
” यू पिपल कॅरी ऑन” जॉनने त्याच्या साथीदारांना त्यांची इन्वेस्टीगेशन प्रोसीजर सुरू करण्यास सांगितले.
त्याचे साथीदार आपापल्या ठरवून दिलेल्या कामात गुंतून गेले. जॉनने बेडरूममध्ये एकदा पुन्हा आपली नजर सगळ्या गोष्टींकडे बारकाईने न्याहाळत फिरविली. बेडरूममध्ये कोपऱ्यात एक टेबल ठेवले होते. टेबलवर एक फोटो होता. फोटोच्या बाजूला काही पाकिटे पडलेली होती. जॉनने एक पाकिट उचलले. त्यावर लिहिलेले होते
‘प्रति – सानी कार्टर’.
कदाचित मृतकाचं नाव सानी कार्टर होतं आणि ही पाकिटं त्याला डाकेतून आली होती. जॉनने बाकीची पाकिटं उचलून बघितली. पाकिटं चाळीत जॉन खिडकीजवळ गेला. त्याने खिडकीतून बाहेर बघितलं. बाहेर नयनरम्य तलावाचं दृष्य होतं. फ्लॅटला बाहेर किती सुंदर व्ह्यू होता. काही क्षणांकरीता का होईना जॉन स्वत:ला आणि सभोवतालच्या परिस्थितीला विसरून गेला. गोल तलावाला वेढणारी हिरवीगार हिरवळ पाहून जॉनचं मन जणू अंतर्मुख झालं होतं. तलावाकडे पाहता पाहता तलावाच्या आकाराने त्याचे विचार त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीशी जोडले गेले. तलावाचा आकार जवळपास गोलाकारच होता. जॉनची विचारचक्रे पुन्हा धावू लागली…
‘…. भिंतीवर गोलाकार काय काढले असावे?’
अचानक जॉनच्या डोक्यात विचार चमकला.
‘गोल म्हणजे ‘झीरो’ तर नसावा…. हो नक्कीच गोल म्हणजे झीरोच असावा.’
त्याने आवाज दिला ” सॅम आणि तू डॅन ”
” यस सर” सॅम आणि डॅन समोर येत म्हणाले.
“आपण लिफ्टमध्ये चढतांना आपल्याला एक काळ्या टी शर्टवाला माणूस दिसला होता… आणि त्याच्या टी शर्टवर ‘झीरो’ असं लिहिलेलं होतं …लक्ष होतं ना तुमचं ?” जॉनने त्यांना विचारलं.
” हो सर, माझ्या लक्षात आहे त्याचा चेहरा” सॅम म्हणाला.
” हो सर, माझ्या पण लक्षात आहे” डॅन म्हणाला.
” गुड… लवकरात लवकर खाली जा आणि बघा तो खाली सापडतो का ते?… जा लवकर तो अजूनही जास्त दूर गेलेला नसावा.”
जॉनचे साथीदार सॅम आणि डॅन जवळजवळ धावतच निघाले.
….(क्रमशः)

Online Novel Eng/Hin/Mar Suspense thriller
Zero – The Free Online Suspense thriller Novel in English Hindi & Marathi
http://EnglishOnlineNovel.blogspot.com
http://HindiOnlineNovel.blogspot.com
http://MarathiOnlineNovel.blogspot.com

An Online Novel on Indian History of Zero Invention.

January 4, 2008
Online Novel Eng/Hin/Mar Suspense thriller
Zero – The Free Online Suspense thriller Novel in English Hindi & Marathi
http://EnglishOnlineNovel.blogspot.com
http://HindiOnlineNovel.blogspot.com
http://MarathiOnlineNovel.blogspot.com
A novel named ‘Shunya’ (Zero) written by Sunil Doiphode, a Writer, basically a DRDO software Scientist, is being published in the episode/chapter form on a blog in three languages i,e English, Hindi and Marathi simultaneously. English- http://EnglishOnlineNovel.blogspot.com Hindi-   http://HindiOnlineNovel.blogspot.com Marathi- http://MarathiOnlineNovel.blogspot.com The Novel is already published in Marathi by Shivam Prakashan Pune (June 2007). The roots of invention of Zero lie in the Indian History in Vedic Era. The earliest undoubted occurrence of a zero in India is an inscription at Gwalior, dated Samvat 933 (876 AD), where 50 garlands are mentioned. 270 is written as the current day 270 in Hindi. Brahmagupta’s is the first attempt from any mathematician to explain the arithmetic operations on natural numbers and zero.  Though other civilizations, like Babylonians used some symbol for zero as a placeholder. But those were the Indians in the history of world where the number zero is used as a place holder as well as a number independently and an abstract concept. Indians used to call that number as a ‘SHUNYA’.  ‘Shunya’ is a suspense thriller story, at the same time exploring the Indian history of zero invention, not compromising in any way its entertaining value. The novel tries to put forth the evidences from the Indian history to make the India’s claim of zero invention strong. The novel concept and story was earlier picked up by the 2 potential producers for film making but subsequently dropped due to various reasons. Therefore the author is trying this novel way to go online and get the public support to fulfill his dream and ambition of seeing the story on the screen. The blog on this novel is started from 22nd Nov. 2007 and within a short span has reached over 2500 hits.   An Author of the blog has 3 Indian language novels as a writer and one Indian song album (http://download.com/aamhipuneri)(Inaugurated by Padmashree A.R. Rehman) as a lyricist to his credit. He has  written three Hindi scripts, one Marathi script and two English scripts, which are registered with Film Writers Association, Andheri Mumbai. His forthcoming novels include  – 1)’Black Hole’ – An English novel co-authored by an English Writer Mr Ewen glass (http://www.ewenglass.co.uk). 2)’Madhurani’- A rural social Marathi novel.   Author – Sunil DoiphodeB.E.(Computer Science)WriterScientist CR&DE Engineers, DRDO, Ministry of Defence Pune. Email – sun_doiphode@yahoo.com,sun_doiphode@rediffmail.comPhone – 09423008902 (Mobile),020 27150881/2 Ext 5104 (Office)Fax     020 27150747